अकोले तालुक्यात अवैध दारु धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे

77 हजाराचा मुद्देमाल जप्त || तिघांविरुद्ध गुन्हा
अकोले तालुक्यात अवैध दारु धंद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात सुर असलेल अवैध दारू धंदयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे टाकून 77 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. तर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यात अवैध दारु विक्री होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुक्ल विभागाला मिळाली होती. त्यानुसार दि. 05 ऑगस्ट 2022 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल सह्याद्री, इंदोरीफाटा ता. अकोले, हॉटेल स्नेहभोजन, वीरगाव फाटा ता. अकोले व शाहूनगर अकोले येथे छापे टाकले. या छाप्यात 192.24 ब. ली. अवैध देशीदारू व 3.24 ब. ली. अवैध विदेशी दारू असा एकूण 77 हजार 460 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध दारु विक्री करणार्‍या राजू बबन शिंदे (रा. शाहूनगर, ता. अकोले), विकी ज्ञानदेव रहाणे (रा. अकोले ता. अकोले), भाऊसाहेब बालाजी शिंदे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) या तिघांविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे विभागीय उपआयुक्त अनिल चासकर, अहमदनगर अधिक्षक गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय कोल्हे, निरीक्षक आर. डी. वाजे, निरीक्षक अर्जुन पवार, दुय्यम निरीक्षक संजय बोधे, दुय्यम निरीक्षक एस. एस. ठेंगडे, दुय्यम निरीक्षक व्ही. जी. सूर्यवंशी, एम. डी. कोंडे, डी. वाय. गोलेकर यांनी केली.

कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक सर्वश्री एस. आर. वाघ, बी. ई. भोर, दिगंबर ठुबे, व जवान सर्वश्री सचिन गुंजाळ, सुर्वे, दाते, कदम, कांबळे, पोंधे, महिला जवान श्रीमती. व्ही. एस. जाधव, एस. आर. वराट व वाहन चालक सुशांत कासुळे व व्ही. पाटोळे इत्यादी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com