‘या’ तालुक्यात एवढ्या लाख रूपयांचा बेकायदेशीर गांजा पकडला

आरोपीला केली अटक
‘या’ तालुक्यात एवढ्या लाख रूपयांचा बेकायदेशीर गांजा पकडला

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील मोग्रस (Mogras) येथील ठाकरवाडी (Thakarwadi) शिवारात सुमारे 3 लाख 64 हजार 500 रुपये किमतीचा बेकायदेशीर गांजा पोलिसांनी पकड़ला (Illegal cannabis seized by police) आहे. या प्रकरणी आरोपीस अटक (Arrested) करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत अकोले तालुक्यात (Akole Taluka) अवैध गांजा (cannabis) प्रकरणाचे धागे दोरे लावण्यात अकोले पोलिसांना (Akole Police) यश आले आहे.

दिनांक 07 सप्टेंबर रोजी मोग्रस (Mogras) गावाचे शिवारातील ठाकरवाडी परिसरात शंकर काळु पारधी याने त्याचे वालवाड़ीचे शेताचे बांधावर अवैध रित्या गांजाची लागवड (Cannabis cultivation illegally) केली असल्याची गोपनिय माहिती सपोनि मिथुन घुगे यांना मिळाली होती. या माहितीबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना सविस्तर माहिती दिली. त्यांचेकडुन छाप्याबाबत परवानगी घेवुन या ठिकाणी राजपत्रीत अधिकारी नायब तहसिलदार व्ही व्ही खतोडे व सहकारी यांना कारवाईसाठी रवाना केले.

या ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथे 24 किलो 300 ग्रॅम वजनाचे रुपये 3, 64, 500 रुपयांचे 16 गांज्याची (cannabis) लहान मोठी झाडे मिळुन आले . ही गांज्याची लागवड (cannabis Planting) तसेच त्याची मशागत करणारा शंकर काळु पारधी (Shankar Kalu Pardhi) रा. मोग्रस (Mogras) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुदध अकोले पोलीस स्टेशनला गुरनं 344/2021 एन डी पी एस कायदा 1885 चे कलम 20 (क) (ख) (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .

त्यास दिनांक 08 सप्टें. रोजी न्यायालयात (Court) हजर केले असता न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी (Police cell) मंजुर केली असुन त्यास अजुन कोणी साथीदार आहे काय याचा पोलिस तपास सुरु आहे.

आपले गावात किंवा परिसरात कोठेही अवैध्य गांज्याची झांडाची लागवड, विक्री अथवा वाहतुक होत असेल तर तात्काळ पोलीस ठाणेस कळवा, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस अधिक्षक (SP) अ.नगर यांनी नागरिकांना केले आहे.

ही धड़क कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) व अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे (Additional Superintendent of Police Deepali Kale) व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने (Sub-Divisional Police Officer Rahul Madane) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मिथुन घुगे, अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे सफौ सुनिल साळवे,, पोना अजित घुले, चालक पोना गोविंद मोरे, पोना बाळासाहेब गोराणे, पोकॉ आनंद मैड, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ कुलदिप पर्बत, पोकॉ सुहास गोरे, पोकॉ प्रदिप बढे, यांनी केली. याबाबत पुढील तपास सपोनि मिथुन घुगे हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com