सार्वमत

अकोलेच्या गटविकास अधिकार्‍यास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

अकोलेचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना काल एका ठेकेदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरा अकोले पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. धाड पडल्याचे लक्ष्यात येताच रेंगडे यांनी नोटा खाऊन टाकल्याचे समजते.

नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने येथील पंचायत समिती कार्यालयात काल दुपारी छापा टाकला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना लाच घेताना रंगेहात पकडले.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे ठेकेदार असुन त्यानी तालुक्यातील म्हाळुंगी गावातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. या कामाचे बील रक्कम तिन लाख रूपयांचा चेक काढण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांनी चार हजार रूपये लाचेची मागणी केली होती.त्यानंतर तक्रार दार ठेकेदाराने नाशिक

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता.त्यानुसार पथकाने त्यांना पैशे घेतांना रंगेहात पकडले. रेंगडे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अकोले ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करन्यात आली. तसेच इतर झडती घेन्यात आली.अकोले पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

धाड पडल्याचे लक्षात येताच रेंगडे यांनी नोटा खाऊन टाकल्या, त्यामुळे नंतर त्यांची सोनोग्राफी करण्यात आल्याची चर्चा आहे. गटविकास अधिकार्‍या सारख्या वरिष्ठ अधिकार्‍याला लाच स्वीकारतांना पकडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गटविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याची तालुक्याच्या इतिहासातील ही दुसरी घटना आहे.

Deshdoot
www.deshdoot.com