अकोले : ग्रामपंचायतीसाठी 13 अर्ज दाखल

अकोले : ग्रामपंचायतीसाठी 13 अर्ज दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील 52 ग्रा. पं. च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी 8 ग्रा.पं.साठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले.

बुधवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता. काल दुसर्‍या दिवशी टाकळी येथे 4, धुमाळवाडी 2, निंब्रळ 1, लहीत बुद्रुक 1, ब्राम्हणवाडा 1, वाशेरे 1, कोतूळ 1 व पांगरी ग्रामपंचायतसाठी 2 अशा प्रकारे 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सध्या राखीव जागांवरील उमेदवार कागदपत्रे गोळा करण्याच्या धावपळीत दिसत आहेत. सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांत धाकधूक निर्माण झालेली पाहावयास मिळाली. आजपासून सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने सोमवार नंतर मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com