फोफसंडीत संगमनेरच्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

फोफसंडीत संगमनेरच्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

कोतूळ | प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी घडली. संगमनेर तालुक्यातील कनोली येथील हे पर्यटक असल्याची माहिती हाती आली आहे.

काल फोफसंडी येथे दुचाकीवर हे पर्यटक फोफसंडीला गेले होते. दुपारी दोन ते अडीच वाजनेचे सुमारास हे चार पर्यटक हे फोफसंडी गावाजळ असणाऱ्या ओढ्यावर पाणवठा या ठिकाणी पाण्यात उतरले असता एकजण पाण्यात बुडू लागला असता दुसर्याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली पण रात दोघंही बुडाले.

सोबत आलेले दुसरे दोघा मित्रांनी गावात जाऊन ही माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर काही गावकरी या घटनेकडे धाऊन आले. बुडालेले दोघांचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्याप त्यांचा शोध लागला नाही. पाणवठा येथे पाण्याची खोली जास्त असल्याने यात हे पर्यटक बुडाले. फोफसंडी हे अतिदुर्गम निसर्ग रम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी राज्यभरातून अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. सध्या अकोले तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने निसर्गाचे सौंदर्य व आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इकडे आकर्षित होत आहेत. नेटवर्क नसल्याने ही माहिती लवकर इतरांना समजली नाही. प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचे शोधकार्य सुरू आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com