हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय-डॉ. अजित नवले

हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय-डॉ. अजित नवले
File Photo

अकोले (प्रतिनिधी)

तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त विजय आहे. कायदे मागे घेण्याच्या मागणी बरोबरच शेतकऱ्यांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण मिळावे ही सुद्धा आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारने याबद्दल सुद्धा सकारात्मक घोषणा करावी अशी अपेक्षा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली.

आज शेतकरी आंदोलनाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरात शेतकरी आंदोलनात ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व शहीद शेतकऱ्यांची आज आठवण होते आहे. शेतकरी शहीदांचे हे बलिदान शेतकरी कधीच विसरणार नाहीत. शेतकऱ्यांना शेती संकटातून संपूर्णपणे बाहेर काढल्याशिवाय आपला संघर्ष थांबविणार नाही, असा विश्वास डॉ. नवले यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com