अकोले : देवठाण येथे डोंगरावरून पडून युवक जागीच ठार
सार्वमत

अकोले : देवठाण येथे डोंगरावरून पडून युवक जागीच ठार

Arvind Arkhade

देवठाण (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील देवठाण येथील रहिवासी असलेला अकोले येथील अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते सायन्स महाविद्यालयातील एफ वाय बी ए मध्ये शिक्षण घेणारा आदिवासी युवकाचा डोंगराच्या कड्यावरून पडल्याने जागीच मृत्युमुखी झाल्याची घटना आज उघडकीस आली.

या घटने बद्दल देवठाण परिससरात हळहळ व्यक्त होत आहे. संतोष दामू कातोरे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अकोले पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com