VIDEO : अजित पवार यांची सभा संपताच दशरथ सावंत यांची पोलिसांकडून मुक्तता

VIDEO : अजित पवार यांची सभा संपताच दशरथ सावंत यांची पोलिसांकडून मुक्तता

अकोले l प्रतिनिधी

पोलिसांनी मुक्तता केल्यानंतर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांचे अकोलेत पोहचताच जल्लोशात स्वागत करण्यात आले. ढोल, ताशांच्या गजरात महात्मा फुले चौकापासून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

अगस्ति कारखान्याची निवडणूक येत्या 17 जुलै रोजी होत आहे. या निमित्ताने शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारार्थ आयोजित विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज अकोले येथे जाहीर सभा पार पडली. या सभेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूक वेळी माघारीसाठी दशरथ सावंत यांना विनंती केली होती, त्यानुसार सावंत यांनी जिल्हा बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांच्या विरोधात अकोले तालुक्यातुन सोसायटी मतदार संघातून भरलेला अर्ज माघारी घेतला होता.

अजित पवार अकोलेत शेतकरी समृद्धी मंडळाच्या प्रचारासाठी येणार हे निश्चित झाल्यानंतर ज्येष्ठ नेते सावंत यांनी त्यांच्या सभेत व्यासपीठावर जाऊन गायकर यांच्या संदर्भात जिल्हा बँकेच्या वेळी अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासना बद्दल जाब विचारण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सभेपूर्वी सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांची संगमनेर पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली होती.

अजित पवार यांची अकोलेतील सभा संपल्यानंतर सावंत यांची मुक्तता करण्यात आली. सावंत हे संगमनेरहुन अकोलेत येताच महात्मा फुले चौकात त्याचे भाजप व पिचड समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले व त्यांची बसस्थानक परिसरापर्यंत मिरवणूक काढली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना सावंत, पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितिचे सेवा निवृत्त प्रशासक बी जे देशमुख यांनी गायकर यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र सोडले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेत्यांसह सावंत व शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com