अकोले तालुक्यातील 8 क्रेशरवर कारवाई

अकोले तालुक्यातील 8 क्रेशरवर कारवाई

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात एकूण 11 दीर्घ मुदतीचे खाणपट्टे असून 8 खाणपट्टे यांची मुदत संपलेली आहे. 17 ऑक्टोबर 2022 अखेर फक्त 3 खाणपट्टे चालू आहेत. अशी माहिती तहसीलदार सतीश थेटे यांनी दिली. तर मुदत संपलेल्या खाणपट्ट्यातून उत्खनन होणार नाही याबाबतचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.

महसूल विभागाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या व पर्यावरण विभागाची अनुमती नसलेल्या दगडखाणी बंद करण्याची कार्यवाही करणे. तसेच संबंधित मंडलाधिकारी, तलाठी यांनी खाणपट्ट्याच्या ठिकाणी समक्ष भेट देऊन संबंधित खाणपट्टा, क्रशर सील असल्याची खात्री करावी. त्या ठिकाणी किती ब्रास खडी आणि क्रश सॅन्ड शिल्लक आहे याचा अहवाल सादर करावा. संबंधित मंडळधिकारी अधिकारी, तलाठी यांनी मुख्यालयी राहून खाणपट्टा, क्रशरची वेळोवेळी तपासणी करून मुदत संपलेल्या खाणपट्ट्यातून उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वाहतूक पास व इ.टी.पी जनरेट झाल्याशिवाय गौणखनिजाची वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. विना परवानगी, विना वाहतूक पास असलेले वाहन, खाणपट्टा सिल न केल्याचे आढळून आल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे महसूल विभागाच्या आदेशात म्हटले आहेत.

अकोले तालुक्यातील मुदत संपलेले स्टोन क्रशर व खाणपट्टा धारक खालील प्रमाणे - किसन बबन महाले (बेलापूर), मनोज ज्ञानेश्वर शिंदे (बेलापूर), दत्तात्रय धोंडीबा शेळके (बेलापूर), नामदेव निवृत्ती कुटे (बेलापूर), शरद मनोहर रत्नपारखी (वाशेरे), जगन्नाथ वसंत देशमुख (देवठाण), सचिन किसन सदगीर (कोंभाळणे), बाळासाहेब यशवंत आरोटे (जामगाव) असे आठ स्टोन क्रशर व खाणपट्टा धारक आहेत.

अकोले तालुक्यातील अकोले, विरगाव, समशेरपूर, शेंडी, ब्राम्हणवाडा, राजूर परिसरात गौणखनिज वाहतुक करताना महाखनिज प्रणालीचा वापर करणे, गौण खनिज उत्खनन, वाहतूक करणार्‍या वाहनांना जी पी एस बसविणे बंधनकारक आहे. तसेच मुदत संपलेले खाणपट्टा सील करण्यात आले आहे.

- सतीश थेटे, तहसीलदार, अकोले

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com