अकोले तालुक्यात करोना स्वॅब तपासणी केंद्र सुरू करा

तात्यासाहेब देशमुख यांची मागणी
अकोले तालुक्यात करोना स्वॅब तपासणी केंद्र सुरू करा

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात करोना स्वॅब तपासणी केंद्र व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करावी व अगस्ती सहकारी साखर कारखान्याने सामाजिक भावनेतून उभारलेल्या

कोव्हिड सेंटरला सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन उंचखडकचे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे केली आहे.

करोना महामारीचा वाढता प्रभाव लक्षात घेता अकोले तालुका हा नेहमीच नैसर्गिक तसेच इतर आपत्तींना सामोरा जात असतो. त्याचबरोबर येथील बहुतांश लोक हे शेतकरी आणि कष्टकरी असून त्यांना या करोना महामारीत शेतमालाचे ढासळलेले बाजारभाव तसेच रासायनिक खतांचा तुटवडा अशा इतर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

करोनाची लक्षणे दिसणार्‍या व्यक्तींची वेळेत करोना तपासणी न झाल्याने ती व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर पडते आणि त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढत चालले असून वेळेत खबरदारी नाही घेतली तर परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे.

अकोले तालुक्यात करोना स्वॅब तपासणी केंद्र उभारून तालुक्यातील करोनाची लक्षणं आढळून येणार्‍या व्यक्तींची लवकरात लवकर तपासणी करून पुढील उपचार घेण्यास मदत होईल, जेणेकरून इतर व्यक्तींना संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण कमी होऊन परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.

तसेच पेशंटला व्हेंटिलेटरची गरज भासल्यास तालुक्यात कुठेही व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध नसल्याने पेशंटला इतरत्र उपचारासाठी दाखल करावे लागते. त्या पेशंटची हेळसांड होतेच, परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने पेशंट दगावण्याची शक्यता जास्त असते. अगस्ती सहकारी साखर कारखान्याने सामाजिक भावनेतून उभारलेल्या काव्हिड सेंटरला सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com