corona
corona
सार्वमत

अकोलेत 22 व्यक्ती करोना बाधित

Arvind Arkhade

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्ण वाढतच चालले आहेत. काल मंगळवारी 22 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील एक डॉक्टरचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. तर तालुक्यातील आढळा विभागातील हिवरगाव आंबरे हे गाव हॉटस्पॉट ठरू पाहत आहे.

यामध्ये संगमनेर येथील मालपाणी लॅान्स कोव्हिड सेंटर येथील अहवालात तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील 08 तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील एका डॉक्टरसह तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत.

खानापूर कोव्हिड सेंटर येथे घेतलेल्या 45 व्यक्तींच्या स्वॅबच्या तपासणीचा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल स्थानिक प्रशासनास प्राप्त झाला असून त्यात 10 व्यक्ती बाधित आढळून आल्या तर खासगी लॅब नुसार आलेल्या अहवालात एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.

मालपाणी लॅान्स येथे दिलेल्या स्वॅबच्या अहवालात तालुक्यातील हिवरगाव आंबरे येथील 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 20 तरुण, 15 वर्षीय तरुण, व केवळ 04 महिन्याच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील के. जि. रोडवरील पेट्रोल पंपाच्या मागील 48 वर्षीय पुरुष, हिवरगाव आंबरे येथील 57 वर्षीय पुरुष व औरंगपूर येथील 40 वर्षीय महिला असे एकुण 11 जण करोना बाधित आढळले आहे.

तर खानापूर कोव्हिड सेंटरमध्ये स्वॅबचा अहवाल अहमदनगर शासकीय प्रयोग शाळेतील अहवालानुसार मेहंदुरी येथील 68 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, 45 वर्षीय महिला, कोतुळ येथील 30 वर्षीय महिला, कळस येथील 37 वर्षीय महिला, मनोहरपूर येथील 60 वर्षीय महिला, 12 वर्षीय तरुण, तर पिंपळगाव खांड येथील 35 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला अशा 10 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर खासगी लॅबमधून घोडसरवाडी येथील 71 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यातील एकूण संख्या 324 झाली आहे. त्यापैकी 218 व्यक्ती करोनामुक्त झाले आहेत तर 96 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.आठ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com