अकोले तालुक्यात 58 जण करोना पॉझिटिव्ह

करोना
करोना

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यात करोनाचे दररोज 50 च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. काल सोमवारीही अर्धशतकाच्यापुढे

करोना बाधितांची नोंद झाली. दिवसभरात शहरातील 24, कोतूळ 07, राजूर 06, नवलेवाडी 04 सह 58 व्यक्तींचा अहवाल करोना पॅाझियिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्या 15 व्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे.

दरम्यान तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केलेल्या आवाहना नुसार अगस्ती मंगल कार्यालयात करण्यात आलेल्या शहरातील व्यापारी, दुकाने, कंपनीतील तालुक्यातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अशा तब्बल 467 व्यक्तींच्या टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 38 व्यक्तींचा अहवाल पॅाझिटिव्ह तर 429 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.

सोमवारी घेण्यात आलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये शहरातील 38 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय युवक,80 वर्षीय 40 वर्षीय पुरूष, 21 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, वर्षीय महिला, 36 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, 23 वर्षीय महिला, 54 वर्षीय पुरूष, 59 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय तरुण, 25 वर्षीय महिला,42 वर्षीय महिला, 23 वर्षीय महीला,25 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरुण, 25 वर्षीय तरूण, 50 वर्षीय पुरूष, 49 वर्षीय पुरूष, व अकोलेत कामाला असलेली संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील 38 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक येथील 37 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, कोतुळ येथील 45 वर्षीय महिला,

21 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुणी, 14 वर्षीय युवती, 72 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरूष, 37 वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील 45 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय पुरूष, 39 वर्षीय महिला, 09 वर्षीय मुलगी, सुगाव येथील 29 वर्षीय तरूण, कळस येथील 55 वर्षीय पुरूष, विरगाव येथील 63 वर्षीय महिला, 69 वर्षीय पुरूष, तांभोळ येथील 29 वर्षीयमहिला, ब्राम्हणवाडा येथील 67 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण कळंब येथील 72 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरूष,

07 वर्षीय मुलगी, टाहाकारी येथील 21 वर्षीय पुरुष, देवठाण येथील 30 वर्षीय पुरूष, राजूर येथील 44 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 33 वर्षीयमहिला, 45 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी व अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात राजूर येथील 48 वर्षीय महिला व खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात 32 वर्षीय महिला असे दिवसभरात एकूण 58 व्यक्तीचे करोना अहवाल पॅाझिटीव्ह आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 1453 झाली आहे.

तालुक्यातील वाढत्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी तालुक्यात चाचण्या वाढवण्याच्यादृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. अगस्ती मंगल कार्यालयात घेण्यात येत असलेल्या रॅपिड टेस्टला तालुक्यातील व्यापारी, कर्मचारी यांनी घाबरून न जाता जास्तीत सहभाग घ्यावा, असे आवाहन तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे, डॉ. श्यामकांत शेटे व आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com