Corona
Corona
सार्वमत

अकोले तालुक्यात आढळले 25 करोना बाधित

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या पोहचली 348 वर

Arvind Arkhade

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज गुरुवारी तब्बल 25 जण करोना बाधित आढळले असून त्यात अकोले शहरातील 7 जणांचा समावेश आहे. करोना चा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर ते आजपर्यंतची 25 ही सर्वाधिक संख्या आहे.

आज गुरूवारी खानापुर कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या रॅपिड न्टीजन टेस्टमधील अहवालात शहरातील 7 व्यक्ती व हिवरगाव आंबरे येथील 4 व ब्राम्हणवाडा येथील 1 अशा 12 व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्या आहेत.

यात न्टीजन टेस्ट मध्ये शहरातील शेकईवाडी येथील 18 वर्षीय युवती,39 वर्षिय महिला, 50 वर्षिय पुरुष,नाईकवाडी वाड्याजवळील 36 वर्षिय महीला,पेट्रोल पंपामागील 44 वर्षीय महिला,21 वर्षीय महीला, राजमाता कॅालणीतील 14 वर्षाची मुलगी, हिवरगाव आंबरे येथील 40 वर्षीय पुरुष,21 वर्षीय तरुण,18 वर्षीय तरुण,24 वर्षीय युवक व ब्राम्हणवाडा येथील 40 वर्षीय पुरूष अशा 12 व्यक्तीचा अहवाल न्टीजनमध्ये पॅाझिटीव्ह आला आहे.

तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील 55 वर्षीय पुरुष,77 वर्षीय महिला,इंदोरी येथील 56 वर्षीय पुरुष, कळस येथील 25 वर्षीय तरुण, 44 वर्षीय महीला, लहीत येथील 32 वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथील 52 वर्षीय पुरुष, चास येथील 44 वर्षीय पुरुष अशा आठ जणाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात नवलेवाडी येथील अकोले कॅालेजजवळील 49 वर्षीय पुरुष,21 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महीला, 46 वर्षीय महीला, 23 वर्षीय महीला अशा 5 व्यक्ती पॅाझिटीव्ह आली आहेत आज दिवसभरात एकुण 25 व्यक्ती करोना बाधीत आले आहेत.

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 348 वर पोहचली आहे. दैनंदिन करोना रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.अशा परिस्थितीत देखील नागरिक करोना बाबत गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com