करोना अपडेट
करोना अपडेट|Digi
सार्वमत

अकोले तालुक्यातील दोन तरुणांसह एक महिला करोना बाधित

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी| Akole

तालुक्यातील देवठाण येथील एक युवक व एक महिला तर खिरविरे येथील एक तरुण असे तीन जण काल सोमवारी करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 208 झाली आहे.

काल सकाळी खानापूर कोव्हिड सेंटरमध्ये घेतलेल्या 14 रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 3 व्यक्तींचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यामध्ये तालुक्यातील देवठाण येथील 18 वर्षीय तरुण व 24 वर्षीय महिला व खिरविरे येथील 28 वर्षीय तरुणाचा अहवाल करोना पॅाझिटिव्ह आला आहे.

तर अद्याप रविवारी अहमदनगर येथील प्रयोगशाळेत तालुक्यातील 47 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून त्याचे अहवाल सायंकाळी उशीरपर्यंत अथवा आज मंगळवारी सकाळी येणार आहेत.

तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 208 झाली आहे. त्यापैकी 156 व्यक्ती करोनामुक्त झाले. तर 47 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत अकोले शहरा लगतच्या बाजार समिती जवळील चालक, चाकण येथे एका कंपनीत असणारा लहित गावी आलेला व्यक्ती, केळी येथील वृद्ध, मोग्रस येथील वृद्ध व रविवारी राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील मूळ कोतूळ येथील असलेला तरुण अभियंता असे पाच जण करोनामुळे दगावले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com