करोना अपडेट
करोना अपडेट|Digi
सार्वमत

अकोले तालुक्यात दिवसभरात आढळले 13 करोना रुग्ण

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

अकोले तालुक्यातील करोना चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवसात तेरा रुग्ण आढळून आले आहे.एकाच दिवसात एव्हढया संख्येने रुग्ण आढळन्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यात एकट्या माणिकओझर या आदिवासी खेड्यातून नऊ रुग्ण आढळले. तालुक्यातील रुग्ण संख्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

अकोले तालुक्यात सकाळी वाघापुर येथील 28 वर्षीय तरुणाचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला.त्यानंतर राञी अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील अहवालात तालुक्यातील आणखी 12 जणांचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

यामध्ये माणिक ओझर येथील 9,गोडेवाडी (केळी) येथील 2 तर रेडे गावातील एका व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. गोडेवाडी येथील 40 वर्षीय पुरूष 35 वर्षीय महिला, रेडे येथील 22 वर्षीय तरुण तर माणिक ओझर येथील 58 वर्षीय, 60 वर्षिय,28 वर्षीय,22 वर्षीय महीला, 25 वर्षीय पुरुष व 11 वर्ष,8 वर्षीय, 4 वर्षीय, 2 वर्षीय मुलगी अश्या एकुण तालुक्यातील 12 जणांचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तालुक्यात रुग्णांची एकुण संंख्या 92 पर्यंत पोहचली आहे .शनिवारी 55 जण करोना मुक्त झाले होते त्यात आज 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यामुळे आतापर्यंत 61 जण करोनामुक्त झाले. तीन जण मयत तर 16 जणांवर सध्या उपचार सुरु आहे.

दरम्यान अकोले शहरातील महात्मा फुले चौक - अगस्ती कारखाना रस्त्यावरील कंटेंनमेंट झोन व परिसरातील 200 मीटर पर्यंत जाहीर केलेला बफर्स झोन उठविण्यात आला असून आज सोमवारी सकाळ पासून अगस्ती कारखाना रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com