करोना अपडेट
करोना अपडेट|Digi
सार्वमत

अकोले : करोना रुग्ण संख्या 73 वर

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

अकोले तालुक्यातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी दिवसभरात तालुक्यात 7 जण पॅाझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या 73 वर गेली आहे.

शहरालगतच्या धुमाळवाडीत 7 वर्षाच्या मुलासह त्याची आईही पॅाझिटिव्ह निघाली असून बहिरवाडीत 3 तर पेंडशेत येथे 2 जण करोना बाधित सापडले आहेत.

काल मंगळवारी पेंडींग अहवालात तालुक्यातील विरगाव येथील 31 वर्षीय पुरुष, केळी येथील 75 वर्षीय पुरूष व अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या राजूर येथील 80 वर्षीय महिलेचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता.

तालुक्यातील रुग्णसंख्येत समाविष्ट झाल्यानंतर आज बुधवारी दुपारी तालुक्यातील धुमाळवाडी येथील 7 वर्षीय मुलगा व आदिवासी भागातील पेंडशेत येथील 27 वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात पेंडशेत येथील 81 वर्षीय पुरुष,धुमाळवाडीतील 28 वर्षीय महिला तर बहिरवाडी

येथील 90 वर्षीय व 42 वर्षीय महिला तर 39 वर्षीय पुरुषाचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. आता तालुक्यात रुग्णांची संंख्या वाढून ती 73 झाली आहे .त्यापैकी 41 जण करोनामुक्त झाले असून 2 मयत तर 30 जणांवर उपचार सुरू आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com