अकोले तालुक्यात 22 जण करोनाबाधित

अकोले तालुक्यात 22 जण करोनाबाधित

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे.काल बुधवारीही आणखी 22 व्यक्ती करोना बाधित आढळले आहेत.

त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 990 वर पोहचली आहे.

तालुक्यात काल बुधवारी घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये मन्याळे येथील 36 वर्षीय पुरूष, 06 वर्षीय मुलगा, बेलापूर येथील 45 वर्षीय महिला, राजूर येथील 41 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय महिला, पाडाळणे येथील 60 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगी, समशेरपूर येथील 34 वर्षीय पुरूष,

सावरगाव पाट 80 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय पुरूष, 22 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय महिला, गणोरे येथील 58 वर्षीय पुरूष, अशा 14 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात गर्दणी येथील 75 वर्षीय पुरुष, शहरालगत माळीझाप येथील 05 वर्षीय मुलगा,

शेकईवाडी येथील 58 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी रोडवरील 23 वर्षीय पुरूष, गणोरे येथील 30 वर्षीय पुरूष, 02 वर्षीय मुलगी, राजुर येथील 67 वर्षीय पुरूष, मनोहरपूर येथील 54 वर्षीय पुरूष, अशा आठ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. काल दिवसभर 22 व्यक्ती करोना बाधित आढळले आहे.

तर बुधवारी तालुक्यातून 45 व्यक्तींचे स्वॅब अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ते अहवाल आज गुरुवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 990 झाली आहे. त्यापैकी 774 व्यक्ती बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर 199 व्यक्ती उपचार घेत असून आत्तापर्यंत 17 जणांचा करोनाने बळी गेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com