अकोले तालुक्यात आज दिवसभरात 22 करोना बाधित
सार्वमत

अकोले तालुक्यात आज दिवसभरात 22 करोना बाधित

एकूण रुग्णसंख्या पोहचली 281 वर

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहे. आज रात्री पुन्हा 03 करोना बाधित आढळून आले. करोनाची सुरुवात झाल्या पासून ते आजपर्यंत सर्वाधिक अशा 22 रुग्णांची आजच्या स्वातंत्र्य दिनी नोंद झाली आहे.

आज शनिवारी सकाळी न्टीजन टेस्टमध्ये 15 व खाजगी प्रयोगशाळेतील 04 व्यक्ती असे 19 जण करोना बाधित आढळून आले होते.रात्री त्यात आणखीन तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे दिवसभरात 22 रुग्णांची नोंद झाली .त्यामुळे तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 281 वर पोहचली आहे.

खानापुर येथील कोविड सेंटरमध्ये 130 व्यक्तीच्या रॅपिड अँन्टीजन करोना टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 15 व्यक्ती करोना पॅाझिटीव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील कारखाना रोड येथील 42 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण, 12 वर्षीय युवती, मनोहरपुर येथील 40 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय तरुण, 34 वर्षिय महीला, हिवरगाव आंबरे येथील 51 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 8 वर्षीय मुलगा, कळस येथील 30 वर्षीय तरुण, देवठाण येथील 85 वर्षीय वृद्ध,व कोतुळ येथील 41 वर्षिय पुरूष, 23 वर्षिय पुरूष, 95 वर्षिय महीला अश्या 15 व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.

तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात धामणगाव आवारी येथील 44 वर्षीय पुरूष, परखतपुर येथील 39 वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील 35 वर्षिय पुरुष व कोतुळ येथील 40 वर्षीय पुरुष अशी चार व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्यानंतर रात्री पुन्हा शहरातील पोष्ट फिस जवळील 30 वर्षिय तरुण, कोतुळ येथील 41 वर्षिय पुरुष, व घोडसरवाडी (समशेरपुर) येथील 58 वर्षिय पुरूष अशा प्रकारे आज एकाच दिवसात तालुक्यात 22 जण करोना बाधित आढळून आले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com