अकोलेत 13 करोना बाधित

पाडाळणेच्या संशयित रुग्णाचा मृत्यू
अकोलेत 13 करोना बाधित

अकोले|प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. आज दिवसभरात पुन्हा 13 व्यक्ती करोना बाधित आढळल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 259 झाली. दरम्यान अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील रहिवासी 58 वर्षीय मंडलाधिकारी यांचा करोना अहवाल प्राप्त होण्या आधीच नाशिक येथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री मृत्यू झाला आहे.

सकाळी अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 09 व खाजगी प्रयोगशाळेतील एक असे 10 व्यक्ती करोना बाधित आल्यानंतर सायंकाळी पुन्हा खासगी प्रयोगशाळेतील तीन अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने दिवसभरात करोना बाधितांची संख्या 13 झाली आहे.

शुक्रवारी सकाळी खानापूर येथील कोव्हिड सेंटरमध्ये 77 व्यक्तींच्या रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील कारखाना रोड येथील 35 वर्षीय महिला, शिवाजीनगर 23 वर्षीय महिला, नवलेवाडी येथील 59वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, धामणगाव आवारी 60 वर्षीय महिला, वाशेरे 85 वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथील 52 वर्षीय पुरुष, राजूर येथील 43 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला तर खासगी प्रयोगशाळेतील अहवालात राजूर येथील 75 वर्षीय पुरुष असे 10 अहवाल करोना पॅाझिटिव्ह आले.

त्यानंतर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात कोतूळ येथील 56 वर्षीय महिला, 38 वर्षीय महिला, व 62 वर्षीय महिला अशा दिवसभरात एकूण 13 व्यक्ती पॅाझिटिव्ह आल्या आहेत. तालुक्यातील करोना बाधितांची एकूण संख्या 259 झाली आहे.

त्यापैकी 188 व्यक्ती करोनामुक्त झाले. सध्या 64 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. यात 36 रुग्णांवर खानापूर कोव्हिड सेंटर तर 28 रुग्णांवर खासगी व ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत तालुक्यात 7 जणांचा करोनाने मृत्यू झालेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com