अकोलेत 31 व्यक्ती करोना बाधित

अकोलेत 31 व्यक्ती करोना बाधित

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात गुरुवारी 31 व्यक्ती करोना बाधित आढळले. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 1964 झाली आहे.

उंचखडक 04, ब्राम्हणवाडा 08 मेहंदुरी 06, अकोले शहर 02, कुंभेफळ 03, हिवरगाव 03 सह तालुक्यात 31 व्यक्ती करोना बाधित झाले.

अद्याप परवा पाठवलेल्या 32 व्यक्तींचा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील काल सकाळी आलेल्या अहवालात उंचखडक बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, कळस येथील 40 वर्षीय पुरूष, अकोले शहरातील 54 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय महिला, कुंभेफळ येथील 27 वर्षीय पुरूष, 53 वर्षीय पुरूष, 41 वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील 45 वर्षीय पुरूष, गर्दणी येथील 45 वर्षीय महिला, मेहंदुरी येथील 29 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय पुरूष, हिवरगाव येथील 20 वर्षीय महिला, 80 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरुण, डोंगरगाव येथील 57 वर्षीय महिला अशा 22 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये निळवंडे येथील 25 वर्षीय तरुण, ब्राम्हणवाडा येथील 11 वर्षीय युवती, 14 वर्षीय युवती, 09 वर्षीय मुलगा, 16 वर्षीय तरुण, 35 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण अशा 09 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काल दिवसभरात 31 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर काल खानापूर कोव्हिड सेंटर येथून 32 व कोतूळ ग्रामीण रुग्णालय येथून 15 व्यक्तींचे स्वॅब अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 1964 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com