अकोले तालुक्यात दोन दिवसांत दोघांचा मृत्यू

84 जण करोनाबाधित ; बळींची संख्या 23 वर
अकोले तालुक्यात दोन दिवसांत दोघांचा मृत्यू

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. शनिवारी 31 तर काल रविवारी 53 असे दोन दिवसांत एकूण 84 करोना बाधित सापडले आहेत.

शुक्रवारी कोतूळ येथील एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला व शनिवारी सकाळीच शहरातील कारखाना रोड परिसरातील युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील करोनाचा 23 वा बळी गेला.

अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात कोतूळ येथील 35 वर्षीय महिला,40 वर्षीय पुरूष, कुंभेफळ येथील 45 वर्षीय पुरूष, 15 वर्षीय तरूण, 18 वर्षीय तरुणी, 60 वर्षीय महिला, तांभोळ येथील 40 वर्षीय पुरूष, मेहंदुरी येथील 30 वर्षीय महिला, गणोरे येथील 63 वर्षीय पुरूष, मेहंदुरी येथील 29 वर्षीय पुरूष, अशा 10 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात पेंडशेत येथील 32 वर्षीय महिला, विरगाव येथील 50 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरूष, अंभोळ येथील 23 वर्षीय महिला, कोतुळ येथील 69 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, हिवरगाव आंबरे येथील 48 वर्षीय महिला, राजूर येथील 44 वर्षीय पुरूष, शहरातील के.जी रोडवरील 53 वर्षीय पुरूष, अशा 09 व्यक्ती पॅाझिटिव्ह आल्या.

सकाळी तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये अकोले शहरातील 60 वर्षीय महिला, 40 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष,12 वर्षीय तरुणी, तांभोळ येथील 12 वर्षीय तरुण, चितळवेढे येथील 24 वर्षीय महिला, कुंभेफळ येथील 5 वर्षीय मुलगा, मेहंदुरी येथील 60 वर्षीय पुरूष, 11 वर्षीय मुलगा, 50 वर्षीय महिला, 33 वर्षीय महिला, नवलेवाडी येथील 41 वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथील 35 वर्षीय पुरूष, 05 वर्षीय मुलगा, चैतन्यपूर येथील 19 वर्षीय तरुण, कोंदणी येथील 40 वर्षीय पुरूष, देवठाण येथील 70 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय महिला, 24 वर्षीय महिला, 12 वर्षीय तरुणी, 14 वर्षीय तरुणी, 12 वर्षीय तरुणी, विरगाव येथील 70 वर्षीय पुरूष, गणोरे येथील 14 वर्षीय तरुणी, पिंपळगाव खांड (शेरेवाडी) येथील 45 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय तरुण, 48 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरूष, कोतूळ येथील 46 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय पुरूष, 22 वर्षीय तरुण, अशा 34 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

रविवारी दिवसभरात तालुक्यात एकूण 53 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 1673 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com