अकोले तालुक्यात 32 जण करोना बाधित

एकुण रुग्णसंख्या 1022, दोघांचा बळी
अकोले तालुक्यात 32 जण करोना बाधित

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यात तालुक्यात आजही 32 व्यक्ती करोना बाधित आढळले असून तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या 1022 झाली आहे.

तालुक्यात दोन दिवसांत दोघा जनांचा बळी गेला आहे. तालुक्यातील बळी गेलेल्यांची संख्या 19 झाली आहे. तालुक्यातील विरगाव, औरंगपूर, मध्ये नव्याने बाधित आढळले आहेत.

बुधवारी तालुक्यातील इंदोरी येथील 68 वर्षीय पुरूषाचा अहमदनगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर काल गुरुवारी गर्दणी येथील 75 वर्षीय पुरूषाचा करोनाने मृत्यू झाला असल्याने आता पर्यत करोनाने 19 वा बळी गेला आहे. व्हेंटीलेटर न मिळाल्यानेही मृत्यू होण्याचे घटना घडत आहे. व्हेंटीलेटर बेड रूग्णालयात मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.

तालुक्यात गुरूवारी घेण्यात आलेल्या रॅपिड न्टीजन टेस्टमध्ये गणोरे येथील 52 वर्षीय महीला, 30 वर्षीय महीला, 28 वर्षीय महीला, 33 वर्षीय पुरुष, 05 वर्षीय मुलगा, 04 महिन्याचे बाळ,विरगाव येथील 37 वर्षीय पुरूष,10 वर्षीय मुलगा, 03 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय महीला,नवलेवाडी येथील 57 वर्षीय पुरूष, रेडे येथील 25 वर्षीय तरुण,

कोतुळ येथील 46 वर्षीय महीला, अंभोळ येथील 35 वर्षीय पुरूष, सावरगाव पाट येथील 21 वर्षीय तरुण, 30 वर्षीय महीला, 13 वर्षीय मुलगी, राजुर येथील 55 वर्षीय पुरूष, 47 वर्षीय पुरूष, ऐरंगपुर येथील 44 वर्षीय पुरूष, खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शाहूनगर येथील 52 वर्षीय पुरुष, राजुर येथील 58 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय पुरूष, व अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील रात्री आलेल्या अहवालात 9 जण पॉझिटिव्ह आले आहेत अशा एकुण 32 व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तालुक्याची एकुण रुग्णसंख्या एक सहस्त्रकाच्या पुढे म्हणजेच 1022 झाली आहे.त्यापैकी 841 व्यक्ती बरे होऊन घरी गेलेली आहे.तर 162 व्यक्ती उपचार घेत असुन आत्तापर्यंत 19 व्यक्ती करोनामुळे मृत्यू झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com