अकोले तालुक्यात आणखीण 40 व्यक्ती करोना बाधित

अकोले तालुक्यात आणखीण 40 व्यक्ती करोना बाधित

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे गेल्या दोन दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.

आज बुधवारी अकोले तालुक्यात तब्बल 40 जण करोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्या 489 झाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने खानापुर कोव्हीड सेंटर सह कोतुळ प्राथमिक आरोग्य केंद्र, राजुर ग्रामीण रुग्णालय, ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्र, आदि ठिकाणी अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यास सुरूवात झाली आहे.

आज खानापुर कोविड सेंटर येथे 103 व्यक्तीच्या रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 16 जणांचा अहवाल करोना पॅाझिटीव्ह आला आहे. यामध्ये शहरातील शेकईवाडी येथील 31 वर्षीय महीला, मनोहरपुर येथील 14 वर्षीय तरुण, 13 वर्षीय तरुण, 69 वर्षीय महीला, 21 वर्षीय महीला, 17 वर्षीय युवती, नवलेवाडी येथील 54 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महीला, धुमाळवाडी येथील 20 वर्षीय तरुण, 22 वर्षीय महीला, ढोकरी येथील 48 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, 33 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महीला, खानापुर येथील 53 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय महीला अशा 16 जणांचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तर कोतुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या 39 अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये 4 जणांचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. यात पाडाळणे येथील 67 वर्षीय पुरूष, आंभोळ येथील 70 वर्षीय पुरुष, धामणगाव पाट येथील 15 वर्षीय तरुण, वाघापुर येथील 22 वर्षीय तरूण असे 4 जण पॅाझिटीव्ह आले आहेत.

तर ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या 45 अ‍ॅन्टीजन टेस्ट मध्ये ब्राम्हणवाडा येथील 90 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महीला अशा 4 जणांचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये 49 वर्षीय महीला, 25 वर्षीय महीला, व 5 वर्षीय लहान मुलगी अशा तीन जणांचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. राजुर ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या 8 टेस्टमध्ये जामगाव येथील 47 वर्षीय महिलेचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ढोकरी येथील 80 वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथील 55 वर्षीय पुरूष, म्हाळादेवी येथील 50 वर्षीय पुरुष असे तीन जण पॅाझिटीव्ह आलेत तर खासगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील अगस्ति कारखाना रोडवरील 59 वर्षीय पुरूष, महालक्ष्मी कॉलणीतील 55 वर्षीय पुरूष, लहीत येथील 67 वर्षीय पुरूष, कोतुळ येथील 72 वर्षीय महीला, हिवरगाव आंबरे येथील 40 वर्षीय पुरूष, ढोकरी येथील 62 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महीला, 23 वर्षीय महीला अशा 9 व्यक्ती करोना बाधित आले असुन आज दिवसभरात तालुक्यात एकुण 40 जणांचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 489 झाली आहे. त्यापैकी 316 व्यक्ती करोनामुक्त झाले आहे तर 10 जणांचा बळी गेला आहे. 163 सध्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या पाचव्या शतकाच्या उंबरठ्यावर असून दिवसेंदिवस नवीन गावात करोना चा शिरकाव होत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com