अकोले तालुक्यात १० व्यक्ती करोना बाधित
सार्वमत

अकोले तालुक्यात १० व्यक्ती करोना बाधित

एकूण रुग्णसंख्या पोहचली ३६१ वर

Arvind Arkhade

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवसभर निरंक असलेल्या अकोले शहरात सायंकाळी रायगडनगर येथे एक व्यक्ती करोना बाधित आढळला आहे. सायंकाळी खाजगी अहवालात तालुक्यातील ०३ व्यक्ती करोना बाधित आले. दिवसभरात एकुण १० व्यक्ती करोना बाधित आढळले असून तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ३६१ झाली आहे.

अकोले तालुक्यात आज शुक्रवारी सकाळी रॅपिड ॲटिजन टेस्टमध्ये ०७ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आल्यानंतर सायंकाळी खाजगी अहवालात पुन्हा तिन व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने दिवसभरातील एकुण १० व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

आज शुक्रवारी खानापुर कोविड सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या ४५ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमधील अहवालात तालुक्यातील लहीत येथील ७३ वर्षीय पुरुष,२८ वर्षीय पुरुष, २३वर्षीय महीला,इंदोरी येथील ४५ वर्षीय महीला,२२ वर्षीय महीला, चास येथील २५ वर्षीय पुरुष, कोतुळ येथील १८ वर्षीय युवती अश्या सात व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता.

यानंतर सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात दिवसभर निरंक असलेल्या अकोले शहरातील रायगडनगर येथील ४७ वर्षीय पुरुष, व कोतुळ येथील ४७ वर्षीय पुरुष ४० वर्षीय महीला अशा तीन व्यक्तीचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला असल्याने दिवसभरात १० व्यक्ती बाधित आले आहेत.

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३६१ झाली आहे.त्यापैकी २४५ व्यक्ती करोनामुक्त झाले आहे तर०९ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. १०७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यापैकी ४७ व्यक्ती खानापुर कोविड सेंटर येथे तर ६० व्यक्ती खाजगी रूग्णालयात व जिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यातील बाधितांच्या मृत्यूचा दर २.५१ टक्के आहे तर बरे होण्याचे प्रमाण ७०.२० टक्के आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com