अकोलेत 28 व्यक्ती करोना बाधित

अकोलेत 28 व्यक्ती करोना बाधित

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात बुधवारी तालुक्यात 28 व्यक्ती करोना बाधित आढळले असून त्यात शहरातील महालक्ष्मी कॉलनीतील

7 व्यक्तींसह अकोले शहरात 14, कोतूळ 2, लिंगदेव 02, धुमाळवाडी 02, देवठाण 02 अशा प्रकारे रुग्णांचा समावेश आहे. तालुक्याची एकूण 2127 रुग्णसंख्या झाली आहे.

तालुक्यात काल रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या.त्यामध्ये व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला. तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये अकोले शहरातील एका विद्यालयातील 50 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय पुरूष, शेकईवाडी येथील 35 वर्षीय महिला, 15 वर्षीय तरुण, 11 वर्षीय मुलगी, महालक्ष्मी कॉलनीतील 75 वर्षीय पुरूष, 41 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला,

45 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरुण, 17 वर्षीय तरुणी, 13 वर्षीय मुलगा, सिडफार्म येथील 15 वर्षीय तरुण, धुमाळवाडी येथील 28 वर्षीय पुरूष, 22 वर्षीय महिला, पिंपळदरी येथील 68 वर्षीय पुरूष, राजूर येथील 41 वर्षीय महिला, नवलेवाडी येथील 45 वर्षीय पुरूष, देवठाण येथील 60 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, अबितखींड येथील 33 वर्षीय पुरूष, नाचणठाव येथील 46 वर्षीय पुरूष, कोतुळ येथील 38 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगी, मोग्रस येथील 48 वर्षीय पुरूष, लिंगदेव येथील 75 वर्षीय पुरूष, 70 वर्षीय महिला अशा 28 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com