अकोलेत कंटेनरच्या धडकेत परप्रांतीयाचा मृत्यू

अकोलेत कंटेनरच्या धडकेत परप्रांतीयाचा मृत्यू

अकोले |प्रतिनिधी| Akole

शहरातील कोल्हार-घोटी रस्त्यावर झालेल्या अपघातात एका परप्रांतीय कामगार मित्तल चौव्हान (वय 30, मूळ रा. उत्तर प्रदेश, हल्ली कारखाना रोड अकोले) या इसमाचा समोरून येणार्‍या कंटेनरच्या मागच्या चाका खाली येऊन जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कंटेनर हा अकोले शहरातून राजूरच्या दिशेने जात असताना समोरून बाजारतळाहून मोटारसायकलस्वार मित्तल चौव्हान हा व त्याचा सहकारी बस स्थानकाकडे जात असताना कराळे यांच्या किराणा मॉल समोर दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कंटेनरचा अंदाज न आल्यामुळे त्याने कंटेनरला पाठीमागील बाजूने जोराची धडक दिली. यात मोटार सायकलवरील मित्तल चौव्हान हा जागीच ठार झाला व त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाला.

अपघात घडला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते सचिन नाईकवाडी, नगरसेवक नवनाथ शेटे, भाजप युवा मोर्चाचे शंभू नेहे यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून सदर मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात पोहच केला. यावेळी अकोले पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत करण्यास मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com