अकोले शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस

अकोले -संगमनेर रस्त्याला आले नदीचे स्वरूप
अकोले शहरासह तालुक्यात धुव्वाधार पाऊस

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले (Akole) शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी रात्री व बुधवारी सायं. दोन तास अक्षरशः पावसाने (Rain) झोडपून काढले. अकोले शहर व परिसरात सायं.5 वाजे पासून 7 वाजेपर्यंत धुव्वाधार पाऊस सुरू होता. सुरुवातीच्या शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते.महात्मा फुले चौकातून दरवर्षी प्रमाणे यंदाही गडाख शोरूम (Gadakh Showroom) ते कोतुळेश्वर गॅरेज पर्यंत (Kotuleshwar Garage) अकोले-संगमनेर रस्त्यावर (Akole-Sangamner Road) मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहन चालकांची वाहने चालवितांना तारांबळ पहावयास मिळाली.सोसाट्याचा वारा असल्याने शहरातील अनेक फ्लेक्स व अनेक दुकानांच्या पाट्या उडाल्या.

मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. विद्युत पुरवठा खंडित (Power outage) झाला होता. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली.वाहतुकीची कोंडी झाली होती. तर बुधवारी सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सायं.5 वाजेच्या सुमारास अचानक धुव्वाधार पाऊस सुरू झाला.काही वेळेतच रस्त्यावर पाणीच पाणी वाहन्यास सुरुवात झाली. शेतकरी सध्या पिकांची (Crops) काढणी च्या कामाला लागला आहे.सोयाबीन सह अन्य पिकांची काढणी सुरू असतांनाच काल सायं. च्या सुमारास अचानक पावसास सुरुवात झाली.या जोरदार पावसाने शेतकर्‍यांची खूपच धावपळ उडाली.

अकोले शहरातील परखतपूर,कारखाना,संगमनेर कडे जाणार्‍या रस्त्यांवर पाणीच पाणी वाहू लागले. अनेक व्यापार्‍यांच्या तळ मजल्यात पाणी शिरले,त्यामुळे अनेकांच्या मालाची नुकसान झाली.सुमारे अर्धा ते पाऊण तास हा धुवांधार पाऊस सुरू होता, त्यानंतर सायं.7 वाजे पर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता.त्यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांचे पाणी महात्मा फुले चौकात एकत्रित आले व तेथून पुढे गटारी उन्मळून सर्व पाणी रस्त्यावर आल्या मुळे काही वेळातच रस्त्याला नदीचे (River) स्वरूप प्राप्त झाले होते. रात्री उशिरा पर्यंत कमी -अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या.

अकोले शहरात (Akole City) या पावसाळ्यातील सर्वात जोरदार पाऊस काल पडला.त्यामुळे अनेक शेतकरी व व्यापार्‍यांचे नुकसान झाले.अनेक हौशी तरुणाईने तर शहरातील पावसाचे हे तांडव आपल्या केमर्यात कैद केले व मोहरा चित्रपटातील ‘टीप टीप बरसा पाणी’...हे गाणे डाउनलोड करत सोशल मीडिया वर व्हायरल केले.

Related Stories

No stories found.