अकोले शहर व परिसरात मुसळधार पाऊस

अकोले शहर व परिसरात मुसळधार पाऊस

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले शहर व परिसराला काल रविवारी सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. सुमारे एक ते दीड तास सलग सुरू असणार्‍या पावसामुळे शहराच्या सखल भागात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. मुळा, भंडरदररा पाणलोट क्षेत्रात मात्र पाऊस झाला नाही.

अकोले शहर व परिसरात सलग 2 दिवसांपासून कमी आधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस पडला. काही काळ विश्रांती घेतल्यावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास सुरु झालेल्या मुसळधार पावसाने अकोले व परिसराला सुमारे तास दीड तास चांगलेच झोडपले. या मुसळधार पावसामुळे सखल भागात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. अकोले शहरातील कारखाना रस्त्यावरील वाहणारे पाणी निशिगंधा कॉलनी परिसरात घुसले. साठलेल्या या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर केरकचरा दिसत होता. शहरातील रस्त्यावर पाण्याचे लोट वाहतांना दिसत होते.

परखतपूर रस्त्यावर देखील मोठ्या स्वरूपात पाणी वाहत होते. शेतात पाणीच पाणी साठले होते. मशागतीच्यादृष्टिने हा पाऊस उपयुक्त आहे. शहर व परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. बरसलेल्या रोहिणीच्या पावसाने पेरणी पूर्व मशागीच्या कामाला अनकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मशागतीच्या कामांना काही ठिकाणी सुरुवात होऊ शकेल. पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

वीरगाव वार्ताहराने कळविले आहे की, वीरगाव व देवठाण परिसरात एक तास शांतपणे पाऊस चालू होता. संततधार पावसामुळे रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले. नांगरट झालेल्या शेतात पावसाने पाण्याची चांदणी साचल्याने लवकरच खरिपाच्या मशागतीला सुरुवात होईल. अकोले शहरातील कारखाना रस्त्यावरील वाहणारे पाणी निशिगंधा कॉलनी परिसरात घुसले.साठलेल्या या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर केर कचरा दिसत होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com