करोना अपडेट
करोना अपडेट|Digi
सार्वमत

अकोले शहरात करोना रुग्णांची संख्या सात

46 अहवालांची प्रतीक्षा; शहरवासियांचे टेन्शन वाढले

Arvind Arkhade

अकोले|प्रतिनिधी|Akole

अकोले शहरातील संख्या सात पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे अकोलेकरांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. शुक्रवारी सापडलेल्या 6 रुग्णांच्या संपर्कातील 46 जणांचे स्वॅब तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या तपासणीकडे शहराचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत.शुक्रवारी दिवसभरात तालुक्यात एकूण 8 करोना बाधित आढळून आले. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा अकोले शहरातील तीन व तालुक्यातील लहित येथील एक व्यक्ती असे चार करोना बाधित आढळून आले आहेत.

अकोले तालुक्यातील बहिरवाडी येथील एक व शहरातील कारखाना रोडवरील एका पक्षाच्या पदधिकार्‍यासह तीन असे चारजण पॅाझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा अहमदनगरहून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील कारखाना रोड वरील हासे कॅाम्पलेक्समधील पूर्वीच्या बाधिताच्या कुटुंबातील एक 44 वर्षीय पत्नी, 24 व 25 वर्षीय दोन मुले असे तीन व तालुक्यातील लहित येथील महिला असे चार जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले आहेत.

शुक्रवारी शहरात 6, तालुक्यातील बहिरवाडी व लहित येथील प्रत्येकी एक असे एकूण 8 रुग्ण बाधित आढळून आले. अकोले तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 58 झाली आहे. अकोले तालुक्यासह शहरात रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल अकोले शहरात व्यापार्‍यांच्या झालेल्या बैठकीत आपल्या सोयीने दुकाने सुरू होण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने महात्मा फुले चौकापासून लगतच्या प्रमुख रस्त्यांवर 200 मीटरपर्यंतचा परिसर बफर्स झोन जाहीर केला आहे.

त्यामुळे करोनापेक्षा व्यवसाय सुरू ठेवण्याचा व्यापार्‍यांच्या अतिउत्साहीपणाच्या निर्णयामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे व्यापार्‍यांतच अगोदर जाहीर केल्याप्रमाणे 20 जुलैपर्यंत बंद ठेवला असता तर बरे झाले असते अशी चर्चा ऐकू येत आहे.

शहरातील पहिला बाधित ज्या पतसंस्थेत काम करत होता. त्या संस्थेतील त्याच्या सर्व सहकार्‍यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com