वृद्ध महीलेचा मृत्यू, अंगावरील दागिने गायब; घातपाताची शक्यता

वृद्ध महीलेचा मृत्यू, अंगावरील दागिने गायब; घातपाताची शक्यता

अकोले | प्रतिनिधी

अकोले (Akole) तालुक्यातील आंभोळ (Aambhol) येथील कांताबाई तुकाराम जगधने या ६० वर्षीय महिलेचा शुक्रवारी सकाळी त्यांच्या राहते घरात मृतदेह आढळून आला असून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब असल्याने मृत्यू बाबत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. तर अकोले पोलिसांनी (Police) तपास सुरु केला असुन एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे समजते.

याबाबत माहिती अशी की, अंभोळ येथील पुष्पा अजित जगधने वय ४५ यांचे खबर दिल्यावरून अकोले पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन यात म्हटले आहे कि कांताबाई या सोमवार पासून आजारी होत्या, त्या एकट्याच घरात राहात होत्या. आज शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला असल्याचे म्हटले आहे.

तर त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने अंगावर नसल्याने मृत्यू चोरीच्या उद्देशाने की घातपात? या बाबत संशय व्यक्त केला जात असुन दुपारी मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारीच्या सूचनेवरून मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रवरा हाॅस्पिटल लोणी येथे पाठवला असल्याचे सपोनि मिथुन घुगे यांनी सांगितले. तसेच अकोले पोलिसांनी घातपाताच्या दृष्टीने तपास सुरू केला असुन सायंकाळ पर्यत एका संशयीताला ताब्यात घेऊन तपास सुरु आहे याबाबत अंभोळ गावात सदर महीलेचा खून झाल्याची चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com