अकोलेत कांदा 1600 रुपये प्रति क्विंटल

अकोलेत कांदा 1600 रुपये प्रति क्विंटल

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले (Akole) येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) दिनांक 13/09/2022 रोजी 1670 गोणी कांद्याची आवक (Onion Inward) झाली. एक नंबर कांद्याला (Onion) 1600 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला.

नं. 1 रु. 1300 ते 1600, नं.2 ला रु. 1101 ते 1300, नं. 3 ला रु. 750 ते 1111, गोल्टी रु. 451 ते 800, खाद रु. 100 ते 500 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.

अकोले बाजार (Akole Agricultural Produce Market Committee) आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत केले जाईल याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी घ्यावी.

शेतकरी बंधूनी कांदा विक्री करताना, ज्या व्यक्तीचे नावे 7/12 क्षेत्र आहे त्याचे पूर्ण नाव, गाव व इतर माहिती कांदाची विक्री पट्टी बनविताना बिनचूक द्यावी, 50 किलो बारदान गोणित, वाळवूण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक तथा सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com