अकोलेत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

अकोलेत कांद्याला मिळतोय 'हा' भाव

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये (Akole Agricultural Produce Market Committee) दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची (Onion) 3414 गोणी आवक (Inward) झाली. एक नंबर कांद्यास (Onion) 1225 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला आहे.

नं.1 रु 1051 ते 1225, नं. 2 ला रु. 751 ते 1051, नं. 3 ला रु. 651 ते 751, गोल्टी रु. 451 ते 750, खाद कांद्यास (Onion) रु. 150 ते 501 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.

अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा लिलाव (Onion Auction) वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने लिलावाच्या आदल्या दिवशी सकाळी 12 ते 7 वाजेपर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत कांद्याचे वजन केले जाईल, याची नोंद हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी. शेतकरी बंधूनी कांदा विक्रीस (Onion Sale) आणताना 50 किलो बारदान गोणित, वाळवूण, निवड करुन बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com