अकोलेत कांदा 2125 प्रतिक्विंटल

अकोलेत कांदा 2125 प्रतिक्विंटल
कांदा

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Akole Agricultural Produce Market Committee) कांद्याची (Onion) 941 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास (Onion) 2125 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले. नं.1 रु 1851 ते 2125, नं.2 ला रु.1451 ते 1851, नं.3 ला रु.1151 ते 1451, गोल्टी रु. 1051 ते 1551, खाद रु.250 ते 651 प्रमाणे बाजार भाव मिळाले.

अकोले बाजार (Akole Market) आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा (Onion) योग्य बाजारभाव मिळण्यासाठी लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत व कांदा 50 किलो बारदान गोणित, वाळवून, निवड करून बाजार समितीमध्ये (Market Committee) विक्रीसाठी आणावा. बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टनसिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.