सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई

17 लाख 20 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त
सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई
चोरी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी अकोलेचा पदभार स्विकारताच बुधवारी जुगार, वाळू व अवैध दारुवर छापा टाकत 17 लाख 20 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत केला आहे.

बुधवार 26 मे 2021 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी पथकासह तालुक्यातील देवठाण शिवारातील राजू वसंत बोडखे यांच्या शेतातील शेडमध्ये पैसे लावून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळताना व खेळविताना राजू वसंत बोडखे, मच्छिंद्र साळुंखे, गणेश नामदेव बोडखे, सोमनाथ बारकु उघडे, अनप बापडे अशा पाच जणांना रंगेहाथ छापा टाकून ताब्यात घेतले. यावेळी कॅश रक्कम, जुगाराची साधने, पाच मोटारसायकल, एक फोर व्हिलर कार असा 15 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तर अवैध वाळू वाहतूक करताना एक टेम्पो अकोले पोलिसांनी पकडला असून शुभम संजय चव्हाण यास अटक करून गुन्हा रजिस्टर नंबर 171/2021 भा.द.वि.379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी 2 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तसेच तिसरी कारवाई अवैध दारु विक्रीवर करण्यात आली असून यामध्ये दारूबंदी कायद्यानुसार दोन गुन्हे दाखल केले असून यामध्ये काशिनाथ भिमराव शिंदे (शाहूनगर), सुनिल अर्जुन मेंगाळ, (ठाणगाव) यांना अवैध दारू विक्री करताना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 3460 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी अकोले पोलीस स्टेशनचा नुकताच पदभार स्विकारल्यानंतर अवैध व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या या धडक कारवाई बद्दल अकोलेकरांनी समाधान व्यक्त केले आहे तर या कारवाईचा अवैध व्यवसायिकांनी धसका घेतला आहे. या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com