आढळा धरण भरले

आढळा धरण भरले

वीरगाव (वार्ताहर)

अकोले (Akole), संगमनेर (Sangamner), सिन्नर (Sinner) तालुक्यातील 16 गावांचे भवितव्य अवलंबून असणा-या आढळा धरणाने (Aadhala Dam) पाणीसाठा पुर्णत्वाचा टप्पा रडतखडत पार केला.

शुक्रवारी पहाटे 4 वाजता 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेचे देवठाणचे आढळा धरण पुर्ण भरले आणि सांडव्यावरुन पाणी आढळा नदीत झेपावले.

मागील वर्षी 23 ऑगस्ट रोजी भरलेल्या आढळा मध्यम प्रकल्पाने मात्र यंदा लाभधारकांची चिंता वाढविली होती. तालुक्यातील सारी धरणे स्वातंत्र्यदिनापुर्वीच भरली. आढळा मात्र सरतेशेवटी भरले. परतीचा पाऊसही आढळेल्या पाणलोटात म्हणावा असा न झाल्याने अखेरच्या टप्प्यात आवक दरदिवशी साधारण 5 दलघफू इतकी अत्यल्प होती.

धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरुन 10 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात वाहू लागले. धरण भरुनही जर पाऊस झाला नाही तर नदीपात्र आणि कालव्यांमधून अतिरीक्त पाणी लाभक्षेत्रात जाणार नाही. परिणामी भुजलस्तर धरण भरुनही खालावतच जाईल. सध्या पाणलोटातून पाण्याची आवक पुर्ण मंदावली आहे.

तिनही तालुक्यातील 16 गावांच्या 3914 हेक्टर क्षेत्रातील लाभक्षेत्रात आढळा धरण पुर्णत्वाने भरल्याने आनंदी वातावरण तयार झाले आहे.

Related Stories

No stories found.