अकोले (प्रतिनिधी) -

अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काल मंगळवार पर्यत 396 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर आज बुधवारी उमेदवारी अर्ज

दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

काल गावनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे -सुगाव खुर्द 07, अंबड 02, कळस बुद्रुक 08, लिंगदेव 05,जांभळे 04, उंचखडक बुद्रुक 21, ढोक्री 29, निळवंडे 00, कळस खु 02, टाकळी04, कळंब 01, धामणगाव आवारी 10, हिवरगाव 09, औरंगपुर 06, ब्राम्हणवाडा 13, बेलापुर 13, गणोरे 16, पांगरी 05, रुभोडी 13, धुमाळवाडी 13, बहिरवाडी 03, कोतुळ 17, उंचखडक खुर्द 07, बदगी 06, परखतपुर 04, मेहंदुरी 09, नवलेवाडी 04, पिंपळगाव निपाणी 01 बोरी 01, वाशेरे 05, घोडसरवाडी 01,निंब्रळ 04, लहीत बुद्रुक 04 , पिंपळगाव खांड 04, मोग्रस 04, पिंपळदरी 08, मनोहरपुर 07, कुंभेफळ 03, मन्याळे 06, धामणगाव पाट 02, विरगाव 17, देेेवठाण 14 अशी आज एकुण 312 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

करोना काळात सुरूवातीच्या लॅाकडाऊनमध्ये गावगावात काळजी घेणारे पुढारी, ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी गावातील बाहेरून येणार्या लोकांना शाळांत कॅारंटाईन केले, गाव बंद केले. काही गावात वादही झाले परंतु करोना प्रादुर्भावाची काळजी घेतली. तेच लोक आता ग्रामपंचायत निवडणूक लागताच कोरोनाला विसरले असल्याचे चित्र आहे. त्याकाळात काळजी घेणारेच आता उमेदवारी अर्ज भरताना तहसिल कार्यालयात, सेतु कार्यालय परिसरात मोठी गर्दी करत आहेत. कसलेही सोशल डिस्टंशिग पाळत नाही,मास्क नाही..!त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीने काळजी घेणार्याना निष्काळजी बनविले व करोनाचे तिन तेरा वाजवल्याचे चित्र आहे.

तहसील कार्यालय परिसरात उमेदवार व त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांची एकच गर्दी झाली होती. आज बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरताना सर्व्हर प्रॉब्लेम मुळे उमेदवारांना मनःस्ताप होत आहे. दरम्यान आज ऑफलाइन अर्ज तहसील प्रशासनाच्या वतीने स्वीकारले जाणार आहेत.