अजनुजला वाळू तस्करांचा महसूल पथकावर हल्ला

अजनुजला वाळू तस्करांचा महसूल पथकावर हल्ला

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील अजनुज परिसरातील भीमानदी पात्रात अवैध वाळू चोरीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.21) सकाळी घडली. या कारवाईत 1 जेसीबी ताब्यात घेतला असून 3 जेसीबी 2 ट्रक पळून नेले. तालुक्यातील अजनुज परिसरातील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी मंडल अधिकारी डहाळे, आणि कामगार तलाठी बळी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार मंडल अधिकारी आणि कामगार तलाठी यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी भीमानदीपात्रात छापा टाकला.त्याठिकाणी 4 जेसीबी आणि 2 ट्रकच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई सुरू केली. यावेळी सर्व वाहने पळवून नेत असताना महसूल पथकाने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही ट्रक चालकांनी ट्रक महसूल पथकावर घालत वाहने पळवून नेली. या कारवाईत महसूल पथकाने 1 जेसीबी ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणून जमा केला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुले, वृद्ध जखमी

कारवाई दरम्यान वाळू तस्कर हे जेसेबी पळवून नेताना अजनुज येथे मुले खेळत होती तर काही वृद्ध मंडळी बसलेली होती. तस्कर वाहने जोरात पळवून नेताना मुले आणि काही वयस्कर मंडळी जखमी झाली. मात्र पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याने लहुजी शक्ती संघटनेने आंदोलन इशारा दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com