श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अपशब्द वापरणे हे चुकीचे असून यापुढे असे वक्तव्य कोणी केल्यास जनता अशांना माफ करणार नाही, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी दिला.
नागपूर विधिमंडळ अधिवेशनात अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपाच्यावतीने महात्मा गांधी पुतळा येथे निषेध करण्यात आला. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनप्रसंगी पवार यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात येऊन पवार यांची छबी असलेले फलक जाळण्यात आले.
यावेळी पटारे म्हणाले, काही लोक स्वतःला जाणता राजा म्हणतात. तर त्यांना आपले कार्यकर्ते काय बोलतात, कसे चुकीचे वागतात हे समजत नाही का? सर्वसामान्य जनतेच्या भावना त्यामुळे दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी शहराध्यक्ष मारुती बिंगले, गिरीधर आसने, सुभाष वढणे, नानासाहेब पवार, सुनील साठे, गणेश मुदगुले, बाळासाहेब तोरणे, नितीन भागडे, रामभाऊ तरस, मुकुंद लबडे, मुकुंद हापसे, अनिल थोरात, विजय पटारे, प्रफुल्ल डावरे, विठ्ठल राऊत, दत्ता जाधव, रुपेश हरकल, तेजस उंडे, योगेश ओझा, अविनाश लोखंडे, नारायण काळे, विशाल अंभोरे, महेश खरात, प्रविण लिप्टे, शंतनु फोपसे, गौतम उपाध्ये, माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड, रवि पाटील, दीपक चव्हाण, केतन खोरे, मधुकर गवारे, महेंद्र पटारे, स्वप्नील पावसे, बंडू शिंदे, अजित बाबेल, रवींद्र पंडित, साजिद शेख, दत्ता देवकाते, अशोक लोंढे, विशाल यादव, हंसराज बत्रा, श्रीयश झिरंगे, किरण रोकडे, मिलिंद साळवे, बाळासाहेब हरदास, पुष्पलता हारदास, मीनल हरदास, रेखाताई रिंगे, अनिता शर्मा, सुप्रिया धुमाळ, नंदिनी लगड यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.