
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
सर्वसामान्य लोकांच्या मनातील चीड आणि राग हा सरकारला (Government) दिसून आल्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections) घेत नाही आणि त्यांना सत्तांतराची भिती निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वैजापूर (Vaijapur) येथे शेतकरी मेळ्यामध्ये बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), माजी केंद्रीयमंत्री जयसिंग गायकवाड, पक्ष निरीक्षक अमरसिंह पंडित आमदार सतीश चव्हाण आमदार सतीश काळे आमदार विक्रम काळे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब काका ठोंबरे, अण्णासाहेब माने, द्वारका भाऊ पाथ्रीकर, हरिभाऊ लगाने, संतोष कोल्हे, युवा नेते पंकज ठोंबरे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक अॅड. प्रताप निंबाळकर यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या विचारांचा पक्ष आहे आणि आणि वैजापूर मतदारसंघ (Vaijapur Constituency) हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचारांचा आहे त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आह. कोणीही पक्ष सोडून गेलेले नाही जे गेले त्यांच्यासोबत कोणीही गेलेले नाही, असे निंबाळकर यांनी सांगितले.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की वेगळे पक्ष जाऊन वेगळी चूल मांडणार्यांना लख-लाभ. कोणाचे कोणापासून काही राहिलेले नाही. पक्ष कोणा वाचून थांबत नाही, असे त्यांनी भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे नाव न घेता बोलले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसामान्यांना व शेतकरी व सर्व समजुन घेणारा नव्या उमेदीने काम करणार्या आगामी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) साथ द्या निश्चितच नांदुर मधमेश्वर कालव्यासाठी बांधलेल्या मुकणे, भाम, भावली, वाकी,या धरणावर टाकण्यात आलेल्या आरक्षणावर, तसेच विनायक साखर कारखाना व कामगारांचे थकित वेतनाबाबत आम्ही प्रयत्नशील राहु असे ते यावेळी म्हणाले.
जे 40 आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून गेले परंतु ते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याच नावावर निवडून आणले होते आणि तोंड लपवत गुहाटी, गोवा व्हाया मुंबई असे परत आले. म्हणजे नक्कीच तुमच्या मनामध्ये काही काळेभरे होते म्हणूनच तुम्ही तोंड लपवत फिरत होते. मग तुम्हाला पोलीस बंदोबस्त का लागतो तुमच्या मनात अपराधीपणाची आणि चोरटेपणाची भावना होती. तुमच्या हातात सत्ता आली म्हणजे सत्तेच्या जोरावर वाईट वागू नका. केंद्रात तुमचे सरकार आहे राज्यात तुमचे सरकार आहे तरी तुम्ही शेतकर्यांच्या पीक विमा संदर्भात बोलत नाही. महागाई बेरोजगारीवर देखील तुम्ही काही बोलत नाही सरकार मूग गिळून बसलेले का आहे.
हा भव्य शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, मनोज घोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक सिंग राजपूत, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोसले. जिल्हा सरचिटणीस एल एम पवार, सरपंच अमृत शिंदे. बाळासाहेब शेळके, सुधाकर बागुल, बाबासाहेब मगर, बंटी मगर, गणेश पवार, आनंद निकम, उल्हास ठोंबरे, विशाल शेळके, भगतसिंग राजपूत, यांनी परिश्रम घेतले. यावेळी माजी उद्योग संचालक जे. के.जाधव, युवा नेते ऋषी अनर्थे, गणेश अनर्थे. आदीसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.