अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री निवडीनंतर नगरमध्ये जल्लोष

फटाके फोडत, पेढे भरवून कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आनंद
अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री निवडीनंतर नगरमध्ये जल्लोष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्रमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्ताधारी फडवणीस शिंदे गटाला जाऊन मिळाला असून या घडामोडीत महाराष्ट्राला पुन्हा एक नवीन उपमुख्यमंत्री मिळाला आहे. अचानक झालेल्या या सर्व राजकीय घडामोडी मुळे अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत, तर काही ठिकाणी या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून नगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटा सोबत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल फटाकडे फोडून पेढे भरून जल्लोष साजरा केल.

यावेळी सुरेश बनसोडे, नगरसेवक अजिंक्य बोरकर, कवाडे गटचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, सोमा शिंदे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, पप्पु पाटील, अमोल जाधव, वैभव साळुंके, सचिन कसबे, राहुल सोनटक्के, अक्षय बोरूडे, धम्मा गायकवाड, तेजस गायकवाड आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे बनसोडे म्हणाले, आज जो मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला असून यामध्ये उपमुख्यमंत्रीपदी पवार यांची निवड झाल्याबद्दल नगर शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणात फटाके वाजून व पेढे भरून जल्लोष साजरा केला. तसेच शहराचे आ. जगताप देखील त्यांच्याबरोबर असून कार्यकर्त्यांचा पक्ष फक्त आ. संग्राम जगताप असून त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहणार आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले असून महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहणार आहे. त्याचप्रमाणे आ. जगताप यांच्यामुळे विकास कामे पुन्हा एकदा जलद गतीने सुरू होणार असल्याची भावन व्यक्त केली.

दरम्यान, अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री निवडीनंतर राष्ट्रवादीच्या एका गटाने नगर शहरात जल्लोष केला असला तरी पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते अद्याप शांत आहेत. येणार्‍या काळात घडणार्‍या घडामोडीनंतर हे नेते आपले पत्ते खुले करणार असून ते नेत आणि कार्यकर्ते उपमुख्यमंत्री पवार यांच्या सोबत जाणार की राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना साथ देणार यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com