पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांचा शिवसेनेत प्रवेश

पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांचा शिवसेनेत प्रवेश

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतने व भाजपचे पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांनी भाजपला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यात एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय अजित मुरकुटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी घेतला आहे.

नेवासा, शिंगवेतुकाई, कुकाणा, बहिरवाडी, बेलपिंपळगांव, शनीशिंगणापूर येथील अनेकांनी भाजप सोडून गडाख गटात प्रवेश केला आहे. अजित मुरकुटे यांचा पक्ष प्रवेशाबद्दल अनेकांनी माजी आमदारांवर टीका केली.

अजित मुरकुटे म्हणाले की मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंसाठी संघर्ष केला. मुरकुटे यांना साथ दिली परंतु गेल्या काही दिवसात मा. आ. मुरकुटे यांनी खालच्या पातळीचे राजकारण सुरू केले आहे. राजकारण करत असताना पातळी सोडून राजकारण सुरू केले आहे यामुळे सरळ राजकारण करत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ना शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून कार्यकर्ता म्हणून काम करणार असून देवगाव व परिसरात संघटना बळकटी साठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अजित मुरकुटे म्हणाले. याप्रसंगी अजित मुरकुटे यांचा ना शंकरराव गडाख यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेशाबद्दल सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.