पर्यावरण संवर्धनाचा जागरासाठी रोपवाटिका निर्मितीचे लक्ष्य
सार्वमत

पर्यावरण संवर्धनाचा जागरासाठी रोपवाटिका निर्मितीचे लक्ष्य

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची ऑनलाईन राज्यस्तरीय बैठक पार

Dnyanesh Dudhade

Dnyanesh Dudhade

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

येत्या वर्षभरात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ स्थानिक देशी, ऑक्सिजन देणार्‍या जंगली बियाणांची रोपवाटिका निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची राज्यस्तरीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच पार पडली. निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष तथा वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकित पर्यावरण संवर्धनाचा जागर करुन राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली.

राज्यसचिव धीरज वाटेकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. बियाणांसाठी आवश्यकतेनुसार मंडळाचे सल्लागार वनश्री डॉ. महेंद्र घागरे यांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. मंडळातर्फे सातत्याने मांडल्या जाणार्या कार्बन क्रेडिटच्या मुद्दा बैठकित उपस्थित करण्यात आला. येत्या काळात घराच्या आसपास, बेडरूम, बाल्कनी, सोसायटीत, रस्त्याच्या कडेने लावावयाची झाडे, शेतकर्यांच्या बांधावर लावावयाची झाडे आदिंचे कौशल्याने नियोजन करण्यास सुचविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना घरातील दुधाच्या, तेलाच्या, किराणा मालाच्या पिशव्यांचा वापर करून प्रत्येकी 10 रोपे लावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले. 2016 पासून मंडळाने राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलने घ्यायला सुरुवात केली. गतवर्षी हे संमेलन कोकणात चिपळूणला यशस्वी झाले.

2018 साली नोव्हेंबर महिन्यात तिसरे पर्यावरण संमेलन आणि भूतान; राज्यातील 80 पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा आंतरराष्ट्रीय निसर्ग व पर्यावरण अभ्यास दौरा यशस्वी करण्यात आला. या बैठकित मंडळाचे पदाधिकारी जयसिंगराव जवक, प्रमोद मोरे, डॉ. ललिता जोगड, कांचन सावंत, तुकाराम अडसूळ, संजय ताडेकर, सुधीर कुंभार, अतुल निगवेकर, सिद्धार्थ पटणी, भाऊसाहेब पाटील, मधुकर गायकवाड, माधुरी अहिरे, मनाली देशमुख, काजल बनोडे, माधव केंद्रे, मारुती कदम, नाना पाटील, नवनाथ लाड, निर्मला म्हस्के, पंडितराव म्हस्के, प्रणिता बोरकर, राहुल पाटील, बाळासाहेब कोकरे, रुपाली पाटील, संजय तेडेकर, साईनाथ लोणे, सुहास गावित, सुजित गावित, विजयाचंद्र पाटील, अतुल निगवेकर आदिंनी सहभाग नोंदवला. कार्याध्यक्ष विलास महाडिक यांनी मंडळाने जाहीर केलेला पर्यावरण प्रकल्प उपक्रमाची माहिती देऊन वनश्री प्रतिज्ञाचे वाचन करुन बैठकिचा समारोप केला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com