भिस्तबाग येथील तांदळे टोळीवर मोक्का

भिस्तबाग येथील तांदळे टोळीवर मोक्का

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर शहरातील भिस्तबाग चौकातील नयन राजेंद्र तांदळेसह त्याच्या टोळीवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. एलसीबीचे पीआय अनिल कटके यांनी ही माहिती दिली.

नयन राजेंद्र तांदळे (रा. भिस्तबाग चौक), विठ्ठल भाऊसाहेब साळवे (रा. झापवाडी, नेवासा), अक्षय बाबासाहेब ठोंबरे (रा. प्रेमदान सावेडी), राहुल अशोक पवार (रा. सुपा, पारनेर) आणि अमोल छगन पोटे (रा. सुपा, पारनेर) अशी मोक्का लागलेल्या आरोपींची नावे आहेत.

25 डिसेंबर 2020 रोजी या टोळीने संघटितपणे गुन्हा केल्याचे समोर आल्यानंतर या टोळीविरोधात मोक्काचा प्रस्ताव तयार करून तो नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. एसपी मनोज पाटील यांनी पाठविलेल्या या प्रस्तावाला मंजुरी देत टोळीविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलीस ठाणे अंतर्गत 8 आणि तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत तीन असे 11 गुन्हे या टोळीने केल्याचे उघडकीस आल्याचे पीआय कटके यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com