करोनाने घेतला तिसर्‍या झेडपी सदस्याचा बळी

करोनाने घेतला तिसर्‍या झेडपी सदस्याचा बळी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात ज्याप्रमाणे करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्याच प्रमाणे नगर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात करोना बळींची संख्या वाढतांना दिसत आहे.

आतापर्यंत पाच महिन्यांमध्ये तीन जिल्हा परिषद सदस्य करोनाने हिरावले. तर त्या आधी एका विभाग प्रमुखांसह अनेक कर्मचारी करोना बळी ठरलेले आहेत.

सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, त्यानंतर सदाशिव पाचपुते आणि सोमवार (दि. 12) रोजी सकाळी कांतीलाल घोडके यांचे करोनामुळे निधन झाले. त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहाचे चार सदस्य कमी झाले आहेत. दरम्यान, त्या आधी राहुरी तालुक्यातील सदस्य शिवाजी गाडे यांचे निधन झालेले होते. मात्र, त्यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व करत आहेत.

पाथर्डी तालुक्यातील मिरी गटातील जिल्हा परिषद सदस्य कराळे (वय 41) यांचे ऐन दिवाळीत 13 नोव्हेंबर 2020 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. प्रारंभी त्यांना करोनाने ग्रासले. नंतर त्यातच त्यांचे निधन झाले. ते शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते होते.

त्यानंतर 19 फेब्रुवारी 2021 रोजी काष्टी (ता. श्रीगोंदा) जिल्हा परिषद गटाचे सदस्य, साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे धाकटे बंधू सदाशिवराव पाचपुते ( वय 66 ) यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांच्यावरही पुणे येथे उपचार सुरू होते. त्यानंतर काल (दि. 12) भाजपचे राशीन (ता. कर्जत) गटाचे जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल घोडके (वय 55) यांचे करोनामुळे निधन झाले.

त्यांच्यावरही पुणे येथे उपचार सुरू होते. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत तीन जिल्हा परिषद सदस्यांचा करोनामुळे दुर्दैवी अंत झाला. या शिवाय जिल्हा परिषदेचे काही अधिकारी, तसेच कर्मचार्‍यांनाही करोनाची लागण होऊन त्यांचा अंत झाला आहे. यावर जिल्हा परिषदेच्या इतर सदस्यांसह अधिकारी-कर्मचार्‍यांना मधून हळहळ व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात काम करणार्‍या काही कर्मचार्‍यांना एकदा नव्हे, तर उपचारानंतर दुसर्‍या करोना झालेला आहे. एका कर्मचार्‍याला करोना लस घेतल्यानंतर दुसर्‍यांदा त्यांचा करोना अहवाल बाधीत आलेला आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वतुर्ळात भितीचे वातावरण आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com