जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या ऑनलाईन बदल्या सुरू

सीईंओ क्षीरसागरसह सभापती गडाख, दाते यांची उपस्थिती
जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या ऑनलाईन बदल्या सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)-

करोना संसर्गामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या यंदा समुपदेशनाने ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहेत. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या उपस्थितीत या बदल्यांना सुरूवात झाली.

या बदलीच्या प्रक्रियेत मुख्यालयातील बदली पात्र असणारे कर्मचारी सहभागी झाले. तर तालुका पातळीवरील कर्मचारी हे ऑनलाईन पध्दतीने झुम ऑपच्या माध्यमातून बदलीच्या प्रक्रियेत सहभागी झाले. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, अर्थ विभाग आणि कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू होती. यावेळी सभापती सुनील गडाख, सभापती काशिनाथ दाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com