एप्रिल 2023 मध्ये नगर झेडपीच्या रिक्त जागांसाठी भरती

ग्रामविकास विभागाचे आदेश || रिक्त पदाच्या 80 टक्के जागा भरणार
एप्रिल 2023 मध्ये नगर झेडपीच्या रिक्त जागांसाठी भरती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे राज्य सरकारच्या वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग वगळता अन्य सर्व शासकीय विभागातील भरतीवर बंदी आणली होती. मात्र मंगळवार (दि.15) रोजी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने नगरसह राज्यातील जिल्हा परिषदेत वाहन चालक आणि गट-ड संवर्गातील पदे वगळून उर्वरित रिक्तपदाच्या 80 टक्के जागा भरण्याचे आदेश काढले आहेत. यासाठी वेळापत्रक तयार करून देण्यात आले असून त्यानूसार नगर जिल्हा परिषदेतील रिक्त 1 हजार 200 जागांसाठी एप्रिल 2023 मध्ये लेखी परीक्षा होणार आहे.

ग्रामविकास विभागाने मंगळवारी काढलेल्या आदेशात वाहन चालक आणि गट ड संवर्गातील पदे वगळून रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानूसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्यास्तरावर असणार्‍या जिल्हा नियोजन मंडळामार्फत भरती प्रक्रिया पारपाडावी. रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत त्यांच्या आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागवणे, भरतीच्या परीक्षा यासाठी खासगी कंपनीची नियुक्त करण्यात यावी (गरज असल्यास), परीक्षा या ऑनलाईन, ऑफलाईन घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या जिल्हा नियोजन मंडळाने पारपाडावी. नगर जिल्हा सध्या वेगवेगळ्या विभागात असणार्‍या रिक्त पदांच्या 80 टक्के पदांची संख्या ही 1 हजार 200 असून याठिकाणी कर्मचारी भरतीचा मार्ग ग्रामविकास विभागाच्यावतीने आदेशामुळे मोकळा झाला आहे.

भरतीचे वेळापत्रक

विभागनिहाय बिंदू नामावली आणि रिक्तपदानूसार आरक्षण निश्चित करणे आणि तदनुषंगिक सर्व कामे करणे वेळ अडीच महिने 31 जानेवारी 2023 पर्यंत. पद भरती जाहिरात प्रसिध्द करणे कालावधी 1 आठवडा 1 ते 7 फेब्रुवारी 2023. उमेदवारी अर्ज मागवणे 14 दिवस 8 ते 22 फेब्रुवारी 2023. उमेदवारी अर्जाची छानणी करणे वेळ 1 आठवडा 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023. जिल्हा परिषछ व जिल्हा निवड मंडळाने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनसंदर्भात कार्यवाही करणे 1 महिना 6 मार्च ते 5 एप्रिल. पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमदेवारांना उपलब्ध करून देणे 1 आठवडा 6 ते 13 एप्रिल 2023. परीक्षेचे आयोजन करणे (ऑनलाईन /ऑफलाईन) 14 ते 30 एप्रिल 2023 आणि अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे 1 महिना 1 ते 31 मे 2023.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com