‘झेडपी’करांची मंगळवारपासून कोकण ‘वारी’
झेडपी

‘झेडपी’करांची मंगळवारपासून कोकण ‘वारी’

जिल्हा सेस फंडातून 18 लाखांची तरतूद

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा परिषदेचे (Ahmednagar ZP) पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी हे मंगळवारी सायंकाळी कोकणाच्या दिशेने कूच करणार आहेत. यावेळी रायगड जिल्हा परिषद, जिल्ह्यातील एका पंचायत समितीला भेट आणि एका गावाची पाहणी करत कोकणातील बीच (Beach in Konkan) फिरण्याचा आनंद लुटणार आहेत. या पर्यटन अभ्यास दौर्‍यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 18 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले (ZP President Rajshritai Ghule) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर (ZP CEO Dr. Rajendra Kshirsagar) यांच्या मार्गदर्शनाखाली हे जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी यांच्या नगरहून कोकण वारी (Kokan Tour) सुरू होणार आहे. मंगळवारी रात्री उशीरा रायगड मुक्काम करण्यात येणार असून बुधवारी सकाळपासून पर्यटन अभ्यास दौरा सुरू होणार आहे. दौर्‍यात पहिल्या मुक्कामासाठी रायगडमधील आलिशान हॉटेलमधील 40 ते 45 सुट बुक करण्यात आले आहेत. तर प्रवासासाठी आरामदायी लक्झरी बुक करण्यात आलेली आहे.

अलिबाग, काशिद बीच, मुरूड पंचायत समिती आणि त्यानंतर जंजिरा किल्ल्यावर जावून पर्यटनाचा आनंद जिल्हा परिषद सदस्य घेणार आहेत. या पर्यटन अभ्यास सहलीसाठी प्रत्येक सदस्याला सक्ती करण्यात येत आहे. यासह अधिकार्‍यांना देखील सक्ती करण्यात येत असून राज्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण नगर जिल्ह्यात सापडत असतांना नगर जिल्हा परिषदेने अभ्यास दौर्‍याचे आयोजन केल्याने आर्श्‍चय व्यक्त होत आहे.

अनेक बैठकानंतर दौरा अंतिम

जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या कोकण दौर्‍याबाबत अनेक बैठकांच्या फैरी झाल्या. सुरूवातीला अधिकार्‍यांना दौर्‍यामुळे आपल्या खिशाला झळ बसणार असल्याची शक्यता वाटली. त्यामुळे त्यांनी आधी ‘ना-ना’चा सूर आवळा. मात्र, जिल्हा परिषद सेस फंडातून तरतूद होत असल्याची खात्री झाल्यानंतर अधिकारी दौर्‍यासाठी तयार झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com