दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर झेडपीचे लिफ्ट सुरू

दीड वर्षाच्या प्रतिक्षेनंतर झेडपीचे लिफ्ट सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) दोन्ही लिफ्ट (Lift) अखेर सुरू झाल्या असून सोमवारी (Monday) पदाधिकारी-अधिकार्‍यांच्या हस्ते लिफ्टचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले (Zilla Parishad President Rajshritai Ghule), उपाध्यक्ष प्रतापराव शेळके (Vice President Prataprao Shelke), बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, कार्यकारी अभियंता रविंद्र परदेशी, चौधर आदी उपस्थित होते.

दीड वर्षांपासून जिल्हा परिषदेतील (Ahmednagar Zilla Parishad) दोन्ही लिफ्ट (Lift) नादुरूस्त झाल्याने बंद होत्या. पुढे करोनाच्या (Covid 19) स्थितीमुळे शासनाकडून दुरूस्तीसाठी निधी (Repair Fund) मिळत नव्हता. दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये शासनाने यासाठी निधी मंजूर (Funding approved) करून दोन्ही नवीन लिफ्टसाठी (Lift) परवानगी दिली. दोन्ही लिफ्टसाठी (Lift) 46 लाखांची तरतूद करण्यात आली होती. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या लिफ्टचे काम सुरू होते. अखेर सोमवारी ही लिफ्ट (Lift) सर्वांसाठी खुली झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com