जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी कडूस, तर व्हा. चेअरमनपदी चांदणे बिनविरोध

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी कडूस, तर व्हा. चेअरमनपदी चांदणे बिनविरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय कडूस (नगर मुख्यालय) यांची तर तर व्हा. चेअरमनपदी भाऊसाहेब चांदणे (श्रीरामपूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक 19 डिसेंबर 2021 रोजी झाली. या निवडणुकीत जय श्री. गणेश पॅनलने सर्व 21 जागा जिंकत मोठा विजय मिळविला होता. त्यानंतर सोसारटीच्या चेअरमनपदासाठी अकोले येथील विलास शेळके तर व्हा. चेअरमनपदी पारनेर येथील काशिनाथ नरोडे याना प्रथम संधी देण्यात आली.

या पदासाठीचा पॅनलने निश्‍चित केलेला कार्यकाळ संपल्याने दोन्ही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा अध्यासी अधिकारी विक्रम मुटकुळे यांनी गुरूवारी सायंकाळी संस्थेच्या सभागृहात आयोजित केली होती.

दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच उमेदवाराचे नाव आल्याने अध्यासी अधिकारी मुटकुळे रांनी दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकार्‍ऱ्यांच्या तसेच मावळते चेअरमन शेळके, मावळते व्हा. चेअरमन नरोडे सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com