झेडपीत 1871 जागा रिक्त

प्रशासनावर ताण || भरतीचे सरकारसमोर आव्हान
झेडपीत 1871 जागा रिक्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात आकार आणि विस्ताराने मोठ्या असणार्‍या नगर जिल्हा परिषदेच्या 1 हजार 871 जागा रिक्त आहे. यात सर्वात रिक्त जागा आरोग्य विभागातील असून यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागालाच सलाईन लावण्याची वेळ आली आहे. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन राज्य सरकारकडून नव्याने भरतीच्या घोषणेची अथवा अनुकंपाव्दारे नेमणुका देण्याची वाट पाहत आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या 46 संवर्गात 16 हजार 53 पदांचा आकृतीबंध मंजूर आहे. यात 14 हजार 862 सरळसेवा भरती आणि 1 हजार 191 पदोन्नतीने भरत येणार आहे. रिक्त आणि भरलेल्या पदाचा तपशील हा 31 डिसेंबर 2021 असून त्यानंतर रिक्त पदाच्या संख्येत वाढ झालेली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या मान्यतेने जिल्हा परिषद प्रशासनाने 13 हजार 161 पदांची सरळसेवा भरतीने भरलेली आहे. तर 986 पदे ही पदोन्नतीने भरलेली आहे. अशा प्रकारे सध्या 14 हजार 147 पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत.

रिक्त असणार्‍या पदामुळे जिल्हा परिषद प्रशासनावरील ताण वाढलेला आहे. सर्वात महत्वाचा विभाग असणार्‍या आरोग्य विभागात 304 आरोग्य सेवक पुरूष आणि 577 आरोग्य सेविका महिलांची पदे रिक्त आहेत. यासह प्राथमिक शिक्षण विभागातील उपाध्यपक पदाची 463 जागा रिक्त आहेत. गावात महत्वाचे आणि प्रशासनासोबत गावाचा गाडा हाकणार्‍या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांची 99 पदे रिक्त आहेत. याचा मोठा ग्रामीण भागात जाणवत असून ग्रामसेवक महत्वाचे पद असून अतिरिक्त चार्जमुळे ग्रामसेकांवर ताण वाढत आहे. गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार पातळीवरून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांसाठी भरती वाढण्यात आलेली नाही. त्यातच कोविडच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त ताण पडल्याने भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. मात्र, त्याचा फटका प्रशासन आणि कर्मचार्‍यांना बसतांना दिसल आहे.

संवर्गनिहाय रिक्त पदे

वरिष्ठ प्रशासन अधिकारी 2, वरिष्ठ सहायक 16, वरिष्ठ सहाय्यक स्पर्धा 16, कनिष्ठ सहायक 33, लघु टंकलेखक 1, वाहन चालक 33, ग्रामसेवक 99, ग्रामविकास अधिकारी 10, ग्रामविकास अधिकारी स्पर्धा 21, विस्तार अधिकारी सांख्यिकी 7, विस्तार अधिकारी सांख्यिकी बालकल्याण 3, विस्तार अधिकारी पंचायत 1, कनिष्ठ लेखाधिकारी 4, वरिष्ठ सहायक लेखा 15, कनिष्ठ सहायक लेखा 29, विस्तार अधिकारी कृषी 2, पर्यवेक्षक 55, उपाध्यापक 463, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सरळसेवा 49, स्थापत्य अभियंता सहायक लघु पाटबंधारे 1, कनिष्ठ आरेखक 12, अनुरेखक 8, कनिष्ठ यांत्रिकी 1, जोडारी1, जॅकहॅम डिलर 2, रिंगमन 1, सहाय्यक आवेदक 1, पशूधन पर्यवेक्षक 38, सहाय्यक पशूधन विकास अधिकारी 3, आरोग्य सेवक पुरूष 304, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी 3, आरोग्य सहायक पुरूष 28, आरोग्य पर्यवेक्षक 9, आरोग्य सेविका महिला 577, औषण निर्माण अधिकारी 23, आरोग्य सहायक महिला 4 यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.